STORYMIRROR

Manohar Jadhav

Classics

3  

Manohar Jadhav

Classics

कोसळ कोसळ घना धरेवर

कोसळ कोसळ घना धरेवर

1 min
271


कोसळ कोसळ घना धरेवर तुझी घुमू दे गाणी

या झाडांवर या पानांवर तुझे जमू दे पाणी

गडगड वाजे ढोल नभाचा विजा चमकती बाई !

पावसात या धुंद मनाची किती होतसे घाई !


सरी शिडकतो मने भिजवतो ओल पेरूनी जातो

या मातीच्या जगण्यालाही अर्थ देवूनी जातो

असा भिजवतो नात्यानांही स्वतः रिकामा बाई !

पावसात या धुंद मनाची किती होतसे घाई !


या देहाचे ऊन जाहले वन्ही पेटे रानी

मनकुसुमांची फुले विखुरली हाक विझाली कानी

या देहाचे सांत्वन होते पावसात या बाई !

पावसात या धुंद मनाची किती होतसे घाई !


अंधाराच्या खिडक्यांमधुनी विजा घुसाव्या आता

अंगण ओटी मन गाभारे लख्ख होउ दे आता

अशा हरकती नितळ गोजिऱ्या पावसातल्या बाई !

पावसात या धुंद मनाची किती होतसे घाई !


सरसर येते अंगण भिजते रुजती नाजुक नाती

अल्लड यौवन भिरभिर फिरते हात देउनी हाती

रंग उधळते मधूमालती बांधावरती बाई !

पावसात या धुंद मनाची किती होतसे घाई !



Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics