STORYMIRROR

Manohar Jadhav

Romance

2  

Manohar Jadhav

Romance

इतक्या नाजूक वेळी

इतक्या नाजूक वेळी

1 min
14.1K


इतक्या नाजूक वेळी

भेटीचे गोंदण गाली

शिरशीरी देहा आली

रात्रीच्या चांदण वेळी

चंदनी खिडकीतूनी

चांदणी कधीची आली

देहात पेटल्या वाती 

रात्रीच्या चांदण वेळी

ही धुंदी ओठांवरती

मखमल रुपेरी देही

रंध्रात भिनले काही

रात्रीच्या चांदण वेळी

ही ओढ सर्पिली अंगी

धुंदीचा विळखा घाली

श्वासांना रंगत आली

रात्रीच्या चांदण वेळी

चांदणे निवाले अंती

भेटीत बोललो नाही

देहात जागल्या ज्योती

इतक्या नाजूक वेळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance