कोण माझे
कोण माझे
कोण माझे मी कुणाचा
प्रश्न मोठा छळत असतो
एकली ही वाट सारी
बघ भयाने मी तुडवतो
का नसावे सोबतीला
का असावे एकटेपण
जीवना रे थांबवावी
ही कधीची आर्त वणवण
रात काळी फास होते
स्वप्न अवघे राख होते
मैफिलीमध्ये असुनही
आसवांनी नयन भरते
दिवस फिरतो भोवताली
सांज दारी थांबलेली
आसरा द्याया न कोणी
सावलीही फितुर झाली
