STORYMIRROR

Rama Khatavkar

Romance Tragedy

3  

Rama Khatavkar

Romance Tragedy

कोजागिरीची रात

कोजागिरीची रात

1 min
240

कशी जादू भारलेली, 

कोजागिरीची ही  रात,

कुणी भिजती, जळती  

त्याच चांदणं आगीत. || १.


आज चांद मातलेला 

कशी सावरू सावरू

मन नाही थाऱ्यावर 

कळेनाच काय करू ||२.


कुठे गुंतला काय की, 

मन सख्याचे कळेना,

चंद्र चांदणं पाहून 

तोल आज का ढळेना ||३.


नकळत, की कळत 

कथा जातसे गुंतत

जीव माझा रे, तुझ्यात, 

तुझा आणखी कुणात ||४.


तेच तेच काय सांगू, 

हीच रोजचीच व्यथा,

एक आसू ढाळुनिया 

आता संपविते कथा. ||५.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance