कोहिनूरची व्यथा
कोहिनूरची व्यथा
एक माणूस मला भेटला
म्हणे लंडन जाऊन आला
स्वतः वर रागे भरत
जगाला उगाच कोसला
म्हणे नशीब फुटके माझे
गेलो कोहिनुर पाहायाला
पण कोहिनुर मलाच म्हणाला
(कोहिनुर उवाच)
जा आल्या पावली घरला
अरे वेडी ही तुझी आशा
अन मार्ग तुझा हा चुकला
मी नाही राहिलो आता
जगतात सुंदर पहिला
एका व्यक्ती ने मला हरवले
xxxx नोव्हेंबर सतराला
संदर्भ : xxxx(जन्म साल) नोव्हेंबर सतरा माझ्या प्रिय पत्नी ची जन्म तारीख आणि हि कविता तिला समर्पित

