एक विचार आला मनात...
एक विचार आला मनात...
एक विचार आला मनात...
पण तू नव्हतीस त्यात.
मग चोळाबोळा करत,
फेकून दिले त्याला कचऱ्यात.
मग आली नीरव शांतता... नव्हे अस्वस्थ करणारी शांतता.
उठू.. बसू .. काय करू.. पुरती गोंधळात टाकणारी शांतता.
मग आला दुसरा विचार मागून...
त्यात पाहिले तुला शोधून.
पण तू नाही सापडलीस त्यात.
म्हणून मारली त्याला जोरात लाथ.
दिले आसमंतात भिरकावून...
पुन्हा न येण्याची ताकीद देऊन.
पुन्हा एकदा तीच शांतता.
नको नको झाली आता.
मग घडले काहीतरी वेगळे
मला जे हवे तेच झाले.
एका सुंदर हळुवार क्षणी
एक सुंदर आकृती उमटली
जणू एका मंद ज्योतीने
सारी खोली व्यापून टाकली
नीट पाहिले तर ती तूच होतीस
जवळ ये असं मला खुणवत होतीस
म्हणाली दूर कुठेतरी जाऊ चल
समुद्र किनारी किंवा डोंगरावर
करू साऱ्या जगाची परिक्रमा
न बाळगता कोणाची तमा
आठव मला दिलेले वचन
नेहमी राखशील माझे मन
अन आलो मी भानावर ताडकन
आठवले मला माझे वचन
तुझी सारी स्वप्न माझी
माझा सारा वेळ तुझा
म्हणून आलोच पळत तुझ्यापाशी
मी वेडा प्रियकर तुझा

