खरेदी
खरेदी
आली दिवाळी
खरेदीला जाऊ,
बाजारात पाहू
घे पोरी बाळी...!१
माळा,पणती
आकाश कंदील,
ते चमकतील
रात्री पुरती...!२
खमंग वास
दिवाळी फराळ,
खाती पोरं बाळ
मुखात घास..!३
कपडे नवे
शर्ट पँट साडी,
भुरळ ते पाडी
सर्वांना हवे..!४
रांगोळी फुले
तोरण दाराला,
पाहुणे घराला
आनंदी मुले...!५
दागिने घाली
नेकलेस हार, ...
महागले फार
हौस निवाली ...!६