काही तरी बोल गं
काही तरी बोल गं
ना कवितेचा ना चारोळी
असर होतो तिच्यावर।
ती अशी शांत बसताच
दडपण येतं माझ्यावर।
शांत अशी बसू नकोस
काही तरी बोल गं।
सांभाळून घे या वेड्याला
रुसवा फुगवा सोड गं।
तुझे ते बोल रुपी शब्द मला
भरपुर काही सुचवून जातात।
अन् या वेड्या प्रेम कवीच्या
कविता बघ पूर्ण होतात।

