ज्योतिर्मय
ज्योतिर्मय
वर्णसंख्या:-१२
दारी शुभोत्सव सजवू तोरण
दिवाळीचे करु हसून स्वागत
पाऊलाने कुंकवाच्या येई लक्ष्मी
दीप ज्योतिर्मय घरी उजळत. १
दीपमाळा रोषणाई लखलख
संस्काराची माणुसकीची ऐक्याची
राष्ट्रप्रेम पर्यावरण यशाची
दिपवाती पणत्या ज्योत ज्ञानाची. २
नर्स डाॅक्टर्स सफाई कामगार
पोलिसांना दिवाळीत धन्यवाद
घडविला माणुसकी साक्षात्कार
सत्कार्याने रुग्णसेवा! देऊ दाद. ३
झेंडू तोरणे आरास घरोघरी
भारतीय मालानेच
दिपावली
आकाशकंदील झगमगाटात
नक्षी रांगोळीची अंगणी सजली. ४
नरकचतुर्दशीस फोडू फळ
टाकू मारुन कोरोनाचा राक्षस
महामारी जाऊन जनता मुक्त
मिळे दिलासा सुखमय दिवस . ५
बलिप्रतिपदा पती पत्नीतला
गोड नैवेद्य करुनिया साजरा
भाऊबीज औंक्षणाने आनंदात
बहिणीची भेट दिवस हसरा . ६
गरजूंना मदत फराळ दान
वाटे मनास प्रसन्न समाधान
एक दीपक जवानांसाठी खास
राखतात भारत देशाची शान. ७
लाडू चकल्या करंज्या दिमतीला
छान साजरा दिवाळसण खरा
नाना रंगी नवलाई फटाक्यांची
सुखशांती सदा राहो नित्य घरा. ८
