STORYMIRROR

Rama Khatavkar

Romance

3  

Rama Khatavkar

Romance

जरा जरा

जरा जरा

1 min
12K

(कलिंदनंदिनी वृत्त)


असा हवेत गारवा अजूनही जरा जरा

घुमे मनात मारवा अजूनही जरा जरा


मला हे जुळायचे हिशेब रातराणिचे

हसेन पारिजातकासवेच  मी जरा जरा


तुला मलाच भावते अजूनही सदा फुली

अबोल बंधनातला मधू स्मरू जरा जरा


न सांगता निघून जात मंद शीत वात हा,

अबोध काळजात मात्र बोच ही जरा जरा


दिशादिशांतुनी कसे प्रकाशतात काजवे?

नभांगणात तारका थकीत या जरा जरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance