जगाचें जीवन ब्रह्मा
जगाचें जीवन ब्रह्मा
जगाचें जीवन ब्रह्मा परिपुर्ण ।
जनीं जनार्दन व्यापक तो ॥१॥
तो ह्री गोकुळीं रांगणा नंदाघरीं ।
गौळणी त्या सुंदरीं खेळविती ॥२॥
वेद गीतीं गातीं शास्त्रें विवादतीं ।
खुंटलीसे मति शेषादिकांची ॥३॥
एका जनार्दनी चहूं वाचां परता ।
उच्छिष्ट सर्वथा भक्षी सुखें ॥४॥
