हुंकार
हुंकार
अस्तित्वाचे असंख्य
लचके तुटत गेले...
तरीही ती धैर्याने उभी होती,
केवळ...
आशेच्या एका झोतावर...
की कधीतरी...
तिला ते प्रेम मिळेल!!
कधीतरी...
तिला ते समर्पण मिळेल!!
कधीतरी...
मायेचा हळुवार स्पर्श मिळेल!!
कधीतरी...
तिच्या स्त्रीत्वाला पुर्णत्व मिळेल!!
पण, कदाचित!
कधीतरी या नावाचं वळणच,
तिच्या आयुष्यात नव्हतं!!
अवहेलना...
मत्सर...
द्वेष....
हेच...
तिचं भाग्य होतं!!
पण,
पण!
आता तिने नाकारलं हे भाग्य!
भिरकावून दिलं...
उपरेपणाचं लक्तर!!
अन्...
ज्वलंत केला...
अंतःकरणातील,
हुंकार!!!