हे रंग रुपेरी
हे रंग रुपेरी
हे रंग रुपेरी,
उधळले आज अंबरी.
उधनाले मन आज...
रंगले स्वप्न अनोखे माझ्या अंतरी.
हे रंग रुपेरी,
उधळले आज अंबरी.
स्वप्नातली माझ्या...
तु एक.. ती सुंदर परी,
हरवलो तुझ्यात मी,
ध्यास तुझा माझ्या अंतरी.
हे रंग रुपेरी,
उधळले आज अंबरी.
हात माझा...
आज हाती तुझ्या,
रेशमी स्पर्शाने तुझ्या...
बावरली ही प्रीत बावरी.
हे रंग रुपेरी,
उधळले आज अंबरी.
गंधाळली सांज आज,
सोबतीने तुझ्या,
सांज गंधातली तू....
दरवळणारी ती कस्तुरी.

