घन दाटले आठवांचे
घन दाटले आठवांचे
घन दाटले आठवांचे,
मनात आज माझ्या...
बरसल्या स्मृतींच्या सरी.
नाहल्या पापण्या आनंदाश्रुंत आज,
ओसंडला आनंद अंतरी.
नकळत भेटली आज ती....
प्रिया, माझी परी,
नव्हते स्वप्न कालचे,
आजची भेट ही खरी.
आजवर होते अबोल प्रेम जे...
जाहले व्यक्त सारे आज,
निशब्द होत्या भावना ज्या...
पुन्हा नव्याने बहरल्या आज.
नसले जरी आज नाते तुझे- माझे..
नाही जाहलो कधी मी तुझा जरी,
होती आस जी तुझी मनात माझ्या..
श्वासात अखेरच्या ही राहील खरी.

