तो नाद तुझ्या पैंजणांचा
तो नाद तुझ्या पैंजणांचा
तो नाद तुझ्या पैंजनांचा,
नादावून मला गेला.
पाहताना तुला...
जणु भास मला...
स्वर्गतल्या त्या...
अप्सरेचा झाला.
तो नाद तुझ्या पैंजनांचा,
नादावून मला गेला.
ओठांवरची लाली तुझ्या,
नशिली नजर तुझी,
तो तीर नजरेचा तुझ्या...
काळजात माझ्या भरला.
तो नाद तुझ्या पैजनांचा,
नादावून मला गेला.
ती आगळी अदा तुझी,
अन् चेहरा तुझा,
पाहून आज.....
चंद्र पौर्णिमेचा लाजला.
तो नाद तुझ्या पैंजनांचा,
नादावून मला गेला.
झनकार तुझ्या कांकणांचा,
अन् तो रेशमी स्पर्श तुझा,
स्पर्शाने या......
मोगरा अंतरात माझ्या दरवळला.
तो नाद तुझ्या पैंजनांचा,
नादावून मला गेला.

