हां… मी एक वेश्या
हां… मी एक वेश्या
का लाजावे मी माझ्या मनाला ?
का असावा संकोच माझ्या जीवाला ?
विकले नसते मी माझ्या देहाला,
काय घडले असते ठाऊक तुम्हाला….!
का शरम नाही तुमच्या जीवाला ?
का नाही संकोच तुमच्या मनाला ?
सोडून घरच्या पवित्र लक्ष्मीला
का खेटे घालता माझ्या दाराला….!
मीच मोहिनी, मीच कामिनी,
मीच जगाची संकटमोचीनी .
विकलांग मी,असाह्य-निराधार मी ,
निरर्थक मी. अस्तित्वहीन,निंदनीय मी.
स्वप्नाचा ज्वलंत भास मी.
जगण्याचा फक्त आभास मी….!
का सहन होत नाही एक निर्भया ?
वाचविते मी सहस्र भगिनी-अर्धांगिनी-आया.
कल्पना करवेना जगाची मजविना,
का करावी मग माझीच अवहेलना….!
