गुंतून राहू दे
गुंतून राहू दे
श्वासात तुझा सुगंध जरा दरवळू दे,
डोळ्यातून तुला मनात जरा उतरवू दे,
तुलाही नकळत मला तुझ्यात गुंतू दे,
आत्ताच तर गुंतले होते असंच गुंतून राहू दे!
लाजेची ही लाली गाली एकदा येऊ दे,
मिठीत तुझ्या तुझीच होऊन राहू दे,
स्पर्शाची ही तहान शब्दांनीच मिटू दे,
उसवता जराशी मी पुन्हा एकदा गुंतू दे!
रंगीत स्वप्नाच्या शय्येवर तुजसवे निजू दे,
जागेपणीही रात्रीचे स्वप्न ते ना तुटू दे,
तू नको म्हणून जाताना गुंता सारा सोडवू दे,
त्यानिमित्ताने दोन क्षण पुन्हा गुंतून राहू दे!

