STORYMIRROR

shital sawant

Abstract

4  

shital sawant

Abstract

कळायचंच राहिलं!!!

कळायचंच राहिलं!!!

1 min
240

बेधुंद चालताना पायाकडे पाहायचंच राहिलं,

मोडलेल्या काट्यांच्या वेदनांसाठी थोडं रडायचंच राहिलं!


क्षितिजाकडे चालताना, सुर्यास्ताची लाली डोळ्यात भरायचंच राहिलं,

अंधाराच्या भीतीने विझत्या दिव्याला तेल घालायचंच राहिलं!


तुझ्याबरोबर चालताना तुझ्याकडे पाहायचंच राहिलं, 

हातात हात घालताना डोळ्यात डोळे घालायचंच राहिलं!


पुढे निघून जाताना मागे वळायचंच राहिलं,

स्वतःला कोणत्या वळणावर विसरले हे कळायचंच राहिलं!!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract