आईच्या आठवणीत
आईच्या आठवणीत
बावरलेल्या मनाला तुझीच आठवण येते आई!
ओलसर पापण्याखालच्या, लालसर डोळ्यापुढे तूच दिसतेस गं आई!
थरथरणाऱ्या ओठांवर एकच शब्द येतोय तो म्हणजे आई!
रात्रीच्या या शांततेत जेव्हा मी एकटीच जागी असते,
तेव्हा "झोप आता" म्हणणाऱ्या प्रेमळ शब्दांची मला आठवण येते आई!
आत्ता जेव्हा डोकं दुखतं तेव्हा तुझ्या मालिशची आठवण येते आई!
मध्यरात्रीच्या सुन्न क्षणांमध्ये जेव्हा रातकिडे ओरडतात,
तेव्हा लहान होऊन तुझ्या कुशीत शिरण्याची इच्छा होते आई!
जर कधीच सुंदर रात्र अनुभवली तरीही तू अंगणात लावलेल्या रातराणीच्या गंधाची कमी असतेच गं आई!
जर रात्री थंडी वाजायला लागली तर तू अंगावर पांघरून घालशील असं वाटतं गं आई!
चुकून जरी डोळा लागला तर स्वप्नामध्ये तूच यावी गं आई!
तुझ्यापासून दूर राहून तुझा सहवास तरी लाभेल गं आई!
