STORYMIRROR

Kavita Kale

Romance

3  

Kavita Kale

Romance

गुंता..

गुंता..

1 min
314

कधीकधी,

माझ्या मनात साठलेला त्याचा गुंता...

की त्या गुंत्यात अडकलेलं माझं मन...!

मी सोडवू पाहतेय त्याला

आंबड्यातून सैल सोडलेल्या केसांच्या

गुंत्यासम अलगद हाताच्या हळुवार बोटांनी....

पण,

अचानक येते त्याच्या आठवणींची हळूवार...शितलशी झुळूक

अन हेलावून जातं माझं मन...!

मी मात्र कधी कधी...सुख-दु:खाच्या आठवणींच्या हिंदोळ्यावर..मनसोक्त झुलून घेतेच...!

तरी,

नकळतपणे घालावाच लागतो आवर...

उसळत्या सागराच्या लाटेप्रमाणे

धडधडणाऱ्या माझ्या या मनाला.

मग

कुठतरी...थांबवावच लागतं त्याला...!

जिथे मनाला शांतता मिळेल अशा

जागी....

मी शोधत राहते त्याला,

माझ्या जीवनात आकाशातल्या

ता-याप्रमाणे...तो लख्ख तारा...जो,

उजळून टाकील माझं मन...

तेव्हा ...त्याच्या प्रकाशाने

कदाचित,

सुटेल माझ्या आयुष्याचा गुंता...

कायमचा..!


Rate this content
Log in

More marathi poem from Kavita Kale

Similar marathi poem from Romance