STORYMIRROR

Jyoti Jaldewar

Classics

2  

Jyoti Jaldewar

Classics

गडी म्हणती सकळ

गडी म्हणती सकळ

1 min
14.6K


गडी म्हणती सकळ । कृष्णा तुं घेई कवळ ।

हरी म्हणे उतावीळ । घ्यावा तुम्हीं ॥१॥

गडी नायकती सर्वथा । हरी म्हणे मी नेहे आतां ।

म्हणोनी रुदोनी तत्त्वतां । चालिला कृष्ण ॥२॥

कृष्णा नको जाऊं जाण । तुझें ऐकूं वचन ।

म्हणोनि संबोखुन ।आणिला कृष्ण ॥३॥

एका जनार्दनीं । लाघव दावी चक्रपाणी ।

भक्ता वाढवुनीं । महिमा वदवी ॥४॥


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics