Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Yoginath Nagshetti

Tragedy

1.3  

Yoginath Nagshetti

Tragedy

एक पर्व संपतेय...!

एक पर्व संपतेय...!

2 mins
64


पहिल्यांदा लाखो प्रश्नांच्या सोबतीने हळूच गेटच्या आत जी पावले दबकत दबकत पडली होती, आता त्या पाऊलवाटेवरील ते ठसे आणि ती वाट धुसर होतोय... उमटलेली पावले आणि तो धुसर रस्ता पुन्हा साद घालू पाहतोय आणि सर्वांच्या नकळत महाविद्यालयातील आमचं पर्व संपतेय...


Assignment, Unit Test आता तसेच मागे राहतायेत... Practicals, Journal, Project, Submission ही आमच्या विळख्यातून सुटू पाहतायेत, अवेळी वर्गात जाणे, शेवटच्या बाकांवर बसून दंगा करणे, या सगळ्या गोष्टी असाच इथे सोडून आम्ही एक पाऊल पुढे पोहोचतोय आणि सर्वांच्या नकळत आमचं पर्व संपतेय...


आठवणीच्या या दुनियेत रमताना आठवत राहतात काही मनावर कोरलेल्या घटना... NSS शिबिरातील ती गाण्याची भेंडी, हलगीच्या नादावरचं ते मनसोक्त नाचणं, युथ फेस्टीवलचा तो सराव आणि चॅम्पियनशीप नंतरचं ते ढसाढसा रडणं... रोडवरील ती जमलेली गर्दी, त्या गर्दीतील आमचं पथनाट्य, रॅली, निबंध, वाद विवाद, या सगळ्या वर्तुळातून आता आम्ही बाहेर पडतोय, काळाच्या ओघात इथले आमचं अस्तित्वही आता मिटतेय, सर्वांच्याही नकळत आता आमचं पर्व संपतेय...


नकळत भेटलेले ते मित्र-मैत्रिणी, भाऊ-बहीणीची ती गर्दी, कट्ट्यावरच्या त्या गप्पा, जोशात साजरा केलले ते वाढदिवस, केकसाठी केलेला तो जुगाड, कट्ट्यावरची दंगामस्ती, मित्रामधील बेटींग, मैत्रिणीचं सेटींग... बिनधास्त यारी आणि चहासोबतची ती खारी... कट्ट्यावरची मस्ती आणि सरांची ती धास्ती... अभ्यासाचा तास आणि डब्यातील तो घास, सारं काही बघता बघता रितं होतंय... सर्वांच्या नकळत आता आमचं एक पर्व संपतेय...!


बोचत राहतात मनाच्या हिंदोळ्यावरील महाविद्यालयाच्या या गुलाबी आठवणी... जाताना जड झालीत ती पावलं, ओले झालेत ते डोळे... आसवांची लागली रिघ, रितं होतंय मन... पुन्हा येतील नवी पाखरे, निर्माण होईल नवं जग... आमचे नाहीच राहणार काही इथे शिल्लक... तरी पुन्हा पुन्हा इथेच का शोधतोय इथल्या आठवणींचा खजिना, ते ही थोडे दिवस ताजे वाटतील नंतर राहणार नाहीत त्या खास...


वास्तव नाही आता हा आभासच रोज नव्याने छळतोय... आणिआमच्याही नकळत आमचं एक पर्व संपतेय...


Rate this content
Log in