STORYMIRROR

Sanjay Ronghe

Abstract Action Inspirational

4  

Sanjay Ronghe

Abstract Action Inspirational

दूर जातात लाटा

दूर जातात लाटा

1 min
425

मज काहीच कळेना 

कशाचा हा राग ।

थोडं तर माझ्याशी

जरासं प्रेमानं वाग ।


माहिती आहे अबोला

टिकणार नाही जास्त ।

आहेत माझ्या समस्या

असतात त्याही रास्त ।


नको काहीच मजला

हवे शब्द दोन प्रेमाचे ।

आजकाल अडतं कुठं

कुणा वाचून कुणाचे ।


स्वार्थ नाहीच कसला

सांगतो परत तुजला ।

नसेल तुला बोलायचे

सांगणार काय तुजला ।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract