दुःख
दुःख
समजावू कसे मनाला
का कळेना कुणाला ।
भाव अंतरात माझ्या
तेरी सुचेना मनाला ।
शर्थीने करतो यत्न
घोर किती जीवाला ।
नशीबच आहे फुटके
नाही यशच कशाला ।
अर्थाचा होतो अनर्थ
सांगू काय अशाला ।
होऊ दे दफन सारे
करील अमृत विषाला ।
