STORYMIRROR

Ganesh Godase

Romance

4  

Ganesh Godase

Romance

दोघांती

दोघांती

1 min
265

मी बोललो तुझ्याशी जरी नाही, तुझ्याशीच मी बोलत होतो

रिमझिम तुझ्या आठवांची ती , मी बरसात झेलत होतो


माझ्या एकांताच्या मैफिलीत, नव्हतीस जरी सोबत तू

एकटाच चंद्र तो नभातला परी, मी दोघांती पहात होतो


नव्हतीस तू माझी अन, मीही नव्हतो तुझा कधी

तुझ्यासोबतच परंतु ते सारे, मी बहर झेलत होतो


निरोपाची होती तुला घाई, भेटलीस मावळत्या सूर्यासारखी

तरी चांदण्यात तुझ्या पौर्णिमेच्या मी अखंड नहात होतो


धुक्यात भेटलीस तू अन, आणखी गर्द होत गेलीस

अदृश्य तू होताना मी तुला माझ्यात लपवत होतो


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance