दिंडी ll
दिंडी ll


काय सांगु दोस्त हो अवंदा पिक नाही बहरल.
मक्का-पंढरपूर करुनही, नसीब मा फिरल .
येत होते जात होते गरजत होते बरसत नव्हते.
झाकोळलेल्या आभाळाला ,साक्षी ठेऊन परतत होते.
करपत होते झीरपत नव्हते सरत होते भरत नव्हते.
माना टाकल्या अंकुराला हुलकावनी देत होते.
घसा फाळता फाळता नाही परमेश्वर भेटले.
कुठी कुठी त मानसात येळे कनटेनर घुसले.
एका माग माग नक्षत्र सारे गेले.
पूना दिंडी जायला लोक मोकळे