ध्येयवादी
ध्येयवादी
जन्म लाभला मानवाचा
मिळे श्रेष्ठत्व जगामध्ये
अंत ही असाच व्हावा
हेच ध्येय मनामध्ये
आयुष्याला सुंदर आकार
मिळाला ध्येय साधनेने
दुःखांचे ढग सरकले
आशेच्या नव्या किरणाने
हळूहळू प्रवास करत
आपण चालत जावे
चालता चालता मनात
जाण्याचे ध्येय ठरवावे
ध्येय सोडूनी डोळ्यासमोर
दिसे न काही मजला
संकटाचा सामना करुनी
देह माझा झिजला
मनुष्य जीवन जगताना
समाजाचे तू भान ठेव
विचारांनी समृद्ध होऊन
जगण्याचे तू ध्येय ठेव
