STORYMIRROR

Mitali More

Romance

3  

Mitali More

Romance

चंद्राची कोर

चंद्राची कोर

1 min
464

लट तुझ्या केसांची 

चंद्राची कोर गं

तू माझी चांदणधार 

अन् मी चकोर गं


हा राग तुझा जणू 

अदा तुझ्या रूपाची

जवळ येणं तुझ्या, म्हणजे

परीक्षा आहे विषाची


जवळ आल्याने मरणार 

दुर गेल्यानेही मरणार

तुझ्याशिवाय गं सखे

मी सांग कसा जगणार


आता मनी एकच इच्छा

पूर्ण व्हावी ही प्रेम कहाणी

मी तुझ्या दिलाचा राजा

अन् तू या काळजाची राणी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance