चांदणी
चांदणी
माझ्या रुपास भुलती सारी..
अशी हाय माझी अदाकारी..
राया जवळ या जरा नका पाहू दुरुनी...
उगवली नभी आज नवतीची चांदणी..llधृll
मी तेजप्रभा तुम्ही मनी धरा..
मज राया तुमची राणी करा...
देते तुम्हा दिलात या थारा...
अंगी भरला ईष्काचा वारा..
साज शृंगार करुन राहे उभी अंगणी...
उगवली नभी आज नवतीची चांदणीll१ll
मी घाली नक्षत्राचा हार गळा..
वय नुकतंच झालंय हो सोळा..
नका घालू शीळ नको हा चाळा..
नका पाहू करुन तिरका डोळा..
जीव माझा तुमच्यावरी, मी हो नार देखणी..
उगवली नभी आज नवतीची चांदणीll२ll

