STORYMIRROR

Mrunal Ghate

Romance

4  

Mrunal Ghate

Romance

चांदणे

चांदणे

1 min
678

वृत्त - प्रभाव


सख्या तुझ्या मनातले फितूर चांदणे

तशात धुंद जाहले चतूर चांदणे


अधीर चांदरात गाइ युगुलगीत हे

सुरेल छेडलेस सूमधूर चांदणे


चकोर चांदवा जिथे चकोर गुंतला

वियोग साहवे न,अश्रुपूर चांदणे


लपेटली हळूच आज चांदरात मी

तुझेच स्पर्शभास हे टिपूर चांदणे


धपापतो मदीय ऊर का न थांबतो

अपूर्ण आस लावते निठूर चांदणे


अधीर लोचने परी भरात पौर्णिमा

अजून धुंद यौवनात चूर चांदणे


वरील काव्य एक गझल असून मुसलसल गझल आहे.प्रेम या विषयावरील ही गझल आहे.


Rate this content
Log in

More marathi poem from Mrunal Ghate

Similar marathi poem from Romance