STORYMIRROR

Sandesh Kashid

Inspirational

3  

Sandesh Kashid

Inspirational

चालत रहा तू थांबु नको

चालत रहा तू थांबु नको

1 min
229

*दिशा अचूक अन ध्येय प्रामाणिक*

*चालत रहा तू थांबू नको....*


*होतील वार बघ बदनामीचे* 

*तू बदनामीने खचू नको....* 


*रुसतील किती,हसतील कितीही* 

*तू कर्तव्यावर रुसू नको..*


*वैरी होतील अनेक इथेही* 

*तू गुन्हेगार कधी दिसू नको..*


*करतील कपट आपलेच मतलबी*

 *कपटात इथे तू फसु नको....*


*मीळेल कधी जरी ध्येय तुला ही*

*मग इतरांवर तू हसू नको....*


*विश्वास ठेवुनी कर्मावरती*

 *उठ चाल पुढे तू बसू नको...*


*दिशा अचूक अन ध्येय प्रामाणिक* 

*चालत राहा तू थांबू नको....*


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational