घाव
घाव
1 min
170
*कधी कसा कुणी कुठे हा का रे घाव घातला...*
*गुन्हा हा काय केला मी आवाज येई आतला...*
*पाहिलेली स्वप्न सारी एक क्षणात मोडली ...*
*माझ्याच सावलीने माझी साथ कारे सोडली...*
*न माहिती तुला तुझी स्वप्नात भेट झाली ग...*
*हातात हात घेण्या आधी जाग कशी अली ग...*
*स्वप्न पाहण्या तुझी जागून रात्र काढली ...*
*माझ्याच सावलीने माझी साथ का रे सोडली...*
*जगू कसा तू सांग मी एकटा तुझ्या विना ...*
*सांग जीवनात तू येशील का पुन्हा...*
*तोडण्याचा साठी होती का नाती जोडली...*
*माझ्याच सावलीने माझी साथ का रे सोडली..*
*रात्रीचा केला दिवस मी जीवाचे केले रान ग ...*
*शाई संपलेला पेन कस करू लिखाण ग ..*
*माझ्या वेदनांची पाने तू न वाचताच फाडली ..*
*माझ्याच सावलीने माझी साथ का रे सोडली ....*
