बस कर आता तरी थांब
बस कर आता तरी थांब
पडायचं होतं तेव्हा जरा कमीच पडला,
बस कर आता शेतातला सारा माल सडला...
घामाचं आहे सारं जाईल पुरं वाया,
सरकार विसारलंय आम्हा तु तर दाखव माया...
नको हिसकाऊ रे आता तोंडातला घास,
तुझ्या अश्या वागण्यानं आवळला जातोय गळ्यात फास..
नाही नाही म्हणता तु इतका कसा पडला..
दुष्काळाच्या झळा सोसलेला शेतकरी तुझ्यामुळे रडला...
त्याच हे रडणं बघवत नाही आता
नुकसानाची किंमत घेताना बसतील शासकीय लाता..
बस झालं आता आता तरी थांब, बळीराजाचं हे दुःख सरू दे थोडं लांब
