अवकाळी आहेस तु
अवकाळी आहेस तु
पडायचं होतं तेव्हा जरा कमी का पडला?
ऐन दिवाळीच्या सणाला असा राक्षसावाणी का नडला?
अवकाळी आहेस तु कळलं नाही हे त्याला,
पिकवलेलं सोनं ते मिळलं नाही रे त्याला...
तु लेट आला तसा घेऊन गेला सारं,
शेतकऱ्यांची हाल बघून तुला आनंद झाला कारं...
पिकवलेल्या पिकाला आता उगवलेत सारे कोंब,
दिवाळी सणाला शेतकरी माझा होळीसारख्या मारतोय बोंब...
शासनाचे धोरणही सध्या तुझ्यासारखेच आहे,
जिथं तिथं नुसतं शेतकऱ्यांची पिळवणूक करत राहे....
विनंती करून तुला आता एकच आहे सांगणं,
सडलंय सारं रान पुरे कर तुझं हे वागणं....
पुरे कर आता तुझं हे वागणं.......
