बोलका चाफा.....
बोलका चाफा.....
स्पर्शीले मन माझे, बोलक्या त्या स्पर्शाने......
आल्हाद मज दिलास तू, काळजाच्या हर्षाने......
थिजली ती दुखः सारी, संकटेही धुसर झाली......
हात तुझा हाती अन, चढली गालावरती लाली......
बोलके डोळे तुझे, हा बोलका अबोला......
बोलकी जाणीव तुझी, स्पर्शून सांगते मला......
एकटा मी असलो जरी, तुझ्या आठवणींचा विळखा आहे......
सुगंधित, दरवळणारा, माझा चाफा बोलका आहे......

