STORYMIRROR

Vilas Suryawanshi

Tragedy

4  

Vilas Suryawanshi

Tragedy

बळीराजा

बळीराजा

1 min
347

आभाळं का रूसलं

त्याची दिसनां का रग 

कटाळला बळीराजा 

कुठं लपलं रं ढग ॥


रुसला का तू पावसा रे

काही चुकलं का माझं?

धरणीमाय आसुसली

तुझं पेलावया वझं ॥


धरा टाकीला नांगर 

जुंपली नांगराला लेकं

होवू दे आवंदा जोंधळा

कर सपान पूरं एक ॥


आरं कठोर पावसा 

बिज पेराया बरसं

सोसल्या दुष्काळाच्या झळा

झाली किती रे वरिसं ॥


उपवर झाली लेकं

तीला लागू दे हळदं

उजळाया लेकीला मी

कर्ज घेतलं नगद ॥


तरसली रं जनावरं

पाणी नाही चारा, घास

आला नाही जर का आता

घेईन गळ्याला मी फासं ॥



Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy