माझं शहर
माझं शहर
1 min
11.8K
गिरणगाव श्रमिकांचं,कामगारांचं
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचं
'चले जाव ' क्रांतीचं
गणेशोत्सवाला सुरुवात केल्याचं
भारताच्या प्रवेशद्वाराचं, ऐतिहासिक वास्तूचं
व्यापाराच्या राजधानीचं
नावाजलेलं माझं शहर
आता मात्र कहर झालाय
मुंबई शहराचा रंगच गेलाय
दंगल होईल, 'कसाब' येईल
शक्यता कमी
कामावर गेलेला परत येईल,
माणसांच्या गर्दीतून
मुलगी सुरक्षित राहील
तरीही मुंबईवर माझं प्रेम आहे
कारण
ते पोट भरायचं शहर आहे...
