STORYMIRROR

Dr Nirmala Bhamode

Tragedy Inspirational

4  

Dr Nirmala Bhamode

Tragedy Inspirational

भ्रूण कन्येचा टाहो...!

भ्रूण कन्येचा टाहो...!

1 min
192

नका हो आई-बाबा मारू मला पोटात;

घेऊन जन्म मलाही येऊ द्या जगात


मुलगा अन् मुलगीच्या सारख्याच असतात कळा;

मग! आई मुलापेक्षा मुलीचाच, का गर्भात दाबते गळा


मुलगा वंशाचा दिवा, तर मुलगीही आहे पणती;

उजळते ती दोन्ही कुळे, नसे कर्तृत्वाला गणती


मुलीचा जन्म समजू नका, दुःखाला जबाबदार;

क्षितिजाच्या सीमा तिने, केल्या कधीच्याच पार


जिजाऊच नसेल तर, घडतील कसे छत्रपती शिवाजी;

सावित्रीबाईच्या पुर्णाहुतीनेच, झाले फुले महात्माजी


हवी आहे आई बहीण, भार्या आणिक सून; 

मुलीला जन्म दिला, तरच सुटाल पाशातून


बहीण नसेल तर भावाला, कोण बांधेल राखी ?

भाऊबीजेशिवाय टिकेल का, मग भारतीय संस्कृती !


कळू द्या शक्ती भूवरी मुलीची, उजळू द्या नवप्रभात;

तुमची आत्मजा फुलू बहरू द्या, येऊ द्या या जगात


नाही करणार हट्ट आई-बाबा, ना म्हणेल काही द्या हो;

मलाही जग पाहू द्या, हाच भ्रूण कन्येचा टाहो !!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy