भेटशील
भेटशील
मी आहे गं तुझा वेडा
तू मला वेडं करशील की नाही
जीव ओवाळतो तुझ्यावर
तू एकटी भेटशील की नाही.....
एक गोष्ट विचारतो घाबरून
प्रेमात घे सखे मला आवरून
तूझं प्रेम पाहिजे तू देशील की नाही.....
माझ्यावर चढला प्रेमाचा रंग
चंद्र-तारे आहेत तुझ्या संग
मी वाटेत तुझ्या आहे उभा
मला दिशा तू दाखवशील की नाही...

