STORYMIRROR

Sanjay Dhangawhal

Romance

3  

Sanjay Dhangawhal

Romance

*'भाव माझ्या मनातले'**(संजय

*'भाव माझ्या मनातले'**(संजय

1 min
153

*'भाव माझ्या मनातले'*

*(संजय धनगव्हाळ)*

**************

भाव माझ्या मनातले

तुला कसे सांगायचे

तुच मला सांग

मी तुला कसे मांगायचे


मी कितीदा हात पुढे केला

जेव्हा केला तेंव्हा

तो उदास झाला

या हातातल्या गुलाबाला

कसे तुला द्यायचे 

तुच मला सांग 

मी तुला कसे मागायचे


रूप तुझे देखणे

मी डोळ्यात बंद करून घेतो 

तुझे लाडावलेले हसु

डोळे भरून पाहतो

तुझ्या हसण्यावर मी

किती घायाळ व्हायचे

तुच मला सांग

मी कसे तुला मागायचे


तुला पाहिल्याशिवाय

नजरेलाही रहावत नाही

या नजरेपासून तुला 

दुर करू शकत नाही

किती दिवस या नजरेने

फक्त तुला बघतं रहायचे

तूच मला सांग 

मी तुला कसे मागायचे


मी पाठमोरे होताना

तू वळून मागे बघतेस

मी पाहील्यावर

तू दुर दुर पळतेस

तुझ्या या पळणाऱ्या पावलांन

कसे थांबवायचे

तुच मला सांग 

मी तुला कसे मांगायचे


तुझ्याशी बोलायच म्हटले 

तर तू जराही थांबत नाही

थांबल्यावर तू 

काहीच बोलत नाही

तुझ्या मुक्या शब्दांना मी 

कसे बोलते करायचे

तूच मला सांग 

मी तुला कसे मागायचे


रोज तुझ्यासाठी मी

एक भेट आणत असतो

तू येण्याची वाट बघत असतो

या कोमजलेल्या गजऱ्याला 

मी कसे फुलवायचे

तुच मला सांग 

मी तुला कसे मांगायचे


काय तुझ्या मनात

काहीच कळत नाही

माझ्या होकाराला

तुझा होकार मिळत नाही

काळजाला तुझ्या मी 

कसे मनवायचे

तुच मला सांग 

मी तुला कसे मागायचे


पौर्णिमेच्या उजेडातही 

 तुलाच पाहात असतो

तुझा हात हातात घेताना

काळोख आडवा येतो

या काळोखाला कसे

दुर करायचे

तुच मला सांग

मी तुला कसे मागायचे


भाव माझ्या मनातले

तुला कसे सांगायचे

तुच मला सांग

मी तुला कसे मांगायचे


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance