भास्करा दिशा धर तू मावळतीची....
भास्करा दिशा धर तू मावळतीची....
दीप बिथरला माणुसकीचा
देखाव्यांची पहाट झाली
भाव जाणिले का कोणी मनीचे
मोहून गेले, आव ते बहुरुप्याचे !!
उत्तम नकलाकार तो,
गातो शिवशाहीची गाणी
सांजसकाळी परस्त्री असते आई
रात्र होताच छेडण्याची ती घाई
ऐसी आपली पराक्रमी तरुणाई !!
मंथरा ती हृदयी जपलेली
विचारांवर तिच्याच झालरी,
माझा बाब्या माझ्या घरी,
तुझा कारटा रणधुमाळी..
ऐसी आपली आधुनिक कैकयी !!
जाणून घे यातना मनीची,
दिशा धर तू मावळतीची
चालेल मज तो निरव अंध:कार,
पण ऐसा स्वार्थी दिवस नाही....
भास्करा दिशा धर तू मावळतीची........
