निशब्द मनं....
निशब्द मनं....
1 min
320
पावलं दबकतायत, विचार अडखळतायत
बांधलेली पत्त्यांची घरं कोसळताना दिसतायत...
जग सारं थांबतंय...
हृदयाची धकधक मात्र वाढतेय...!!
झुळझुळणारा तो वारा, वाहायचा थांबलाय...
खळखळणारा तो झरा, आज पूर्णपणेच गोठलाय...
वणव्याच्या त्या ज्वालांमध्ये जंगल सारं पेटलंय...
ढगांच्या त्या अश्रूंमध्ये शिवार माझं भिजलंय...!!
मिणमिणणारा तो दिवा आज विझताना दिसतोय
प्रखर सूर्याचं तेज ते मावळताना दिसतंय...
किलबिलाटाचा तो गोड सूर, गोंगाटात बदलतोय...
लख्ख ते चांदणं आज काळ्या ढगांआड लपलंय...
पण अजूनही मन माझं पैशांमध्ये गुंतलंय...!!
संपावा तो गोंगाट एकदा, व्हावी नवी पहाट..
विचारांचा झरा वाहावा, माझ्या निःशब्द मनात...
