STORYMIRROR

Prashant Ghogare

Tragedy

4  

Prashant Ghogare

Tragedy

बाटली....!

बाटली....!

1 min
408

हे मोकळ्या आभाळा,

तू तरी सांगना,

किती करू हे मद्य प्राशन,

किती वाहू रे दुःख,

बघ संपता संपेना,

हे दुःखाचं डोंगर.....


साथ मद्याची धरिता,

साथ सगळ्याची सुटली,

सोबतीला हि बाटली,

फक्त एकटीच उरली....


तीही साथ सोडेल बघ,

एकटा मी उरेन,

असेल आसवांची धार सोबत,

यमाचा धावा करत असेल रे मन.....


कसं असतं हे आयुष्य,

क्षणात जातं रे सरून,

मग कितीही आठवीता भूतकाळ,

कधी नाही येत रे तो परत..


तेव्हा असतो एकटा,

सोबतीला हि बाटली,

हे मोकळ्या आभाळा,

तू तरी सांगनां, हि दशा माझ्याच नशिबी का मांडली.....!



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy