प्रजाती...!
प्रजाती...!
1 min
281
किती भिन्न ह्या प्रजाती,
किती भिन्न त्यांचे भाव,
असो माणूस वा प्राणी,
सगळं सांगतात त्याचे हावभाव......
जरी दिसतात वेगळे,
वेगळे त्यांचे जीवन,
एक आहे पुरातन,
दुसरं त्याचंच आधुनिक रुप....
माणुसकी प्राण्यांची आहे,
अजूनही जिवंत,
अक्कल असून माणसाला,
प्रेम होतंय मात्र लुप्त...
बाहेरून हसतात माणसे,
आतून झालीया पोकळ,
करून अनुसरण पाश्च्यात्त समाजाचं,
बसवली आपल्या संस्कृती वर धूळ...
बसून शांत,
बघतोय फक्त प्राणी,
हातात काही नाही त्याच्या,
डोळ्यातून करतोय विनवणी,
जप मानवा निसर्गाला,
आम्ही तुमचेच भाऊ,
नको तोडू या जंगलांना,
तुमच्या वस्तीत आम्ही कसं राहू...!
