(बाप)हरवले छत्र पित्याचे..!
(बाप)हरवले छत्र पित्याचे..!


जाच्या तेज्याने लखलखला
होता परिवार सारा
एकाएकी आज कसा
विझला तो तारा
विझला तो दिवा
सर्वत्र काळोख दाटला
हरवले छत्र पित्याचे
बांध काळजाचा फुटला
झाला कोरडा किनारा
आटला आसवांचा झरा
आता घरट्यात माझ्या
माझा होतो कोंडमारा
कसे सावरावे मना
उर येते रे दाटुनी
आस एवढीच आहे
फक्त एकदा जा भेटुनी
का रे देवा तू इतका
कठोर का झाला
ना पहावले सुख माझे
कसा काळाने घात केला
मावळलेला सूर्य तो
पुन्हा नाही उगवला
त्या पहाडी छातीचा
आज डोंगर कोसळला..!