बाप हाच देव (अभंग)
बाप हाच देव (अभंग)
बाप हाच देव, मायेचा सागर,
प्रेमाचे आगर,. माझ्यासाठी.|१
गुरू माझा तात,पकडुनी हात,
आयूष्याची सुरूवात,बापामुळे |२
कळेना मजसी,बालपणी आम्हा
संतुलन राखाया,शिकवीले |३
कळली मज मला,जगायची कला,
पाठीराखा तो ही. सदा असे |४
येता सामोरे संकट,देऊनी आधार,
रक्षण करण्या,. धावतसे |५
असावी सतत,. सावली बापाची
डोईवर माझ्या,.आयूष्यात |६
धरावे मजसी,.कधी मी पडता
तोल सांभाळावा. निरंतर |७
आहे या बाबांचे,अनंत ते कीती
थोर माझ्यावर,. ऊपकार |८
आत्मविश्वासाचा,ताठ तो कण्याचा
बाप माझा असे,. धडाडीचा. |९
