STORYMIRROR

सुरेश तारे

Fantasy

4.5  

सुरेश तारे

Fantasy

अर्थ मौनाचा

अर्थ मौनाचा

1 min
10

कधी कधी शब्दांनाही,
सुट्टी देऊन बघावं...
काहीही न बोलता,
डोळ्यांनीच सगळं सांगावं.

नसावा कुठला आवाज,
नसावी कसली घाई...
शांततेच्या या लहरीत,
अर्थ गवसतो काही.

एक आश्वासक स्पर्श,
एक साधीशी मिठी...
पुरेशी असते ती कधी,
साचलेल्या आठवणींसाठी.

ओठांवरचं हसू आणि,
पापण्यांमधली ओढ...
शब्दांविना राहूनही,
संवाद होतो गोड.

मनातल्या गूढ गाठी,
सहजच सुटून जातील...
न बोलता दिलेले शब्द,
हृदयाला भिडून येतील.

नकोत कसले पुरावे,
नकोत कसली स्पष्टीकरणं...
कधी शांत राहूनही,
मिळतात जगण्याला कारणं.

शब्दांचा हा खेळ सारा,
एकदा थांबवून तर पहा...
मौन किती बोलकं असतं,
एकदा अनुभवून तर पहा. 
___________________ 
सुरेश अनंत तारे🖋️ 
छत्रपती संभाजीनगर.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Fantasy