अन् कविता पूर्ण झाली...
अन् कविता पूर्ण झाली...
भेटता तू मजला सखे
नवीन स्वप्न उदयास आली,
अदा तुझी अशी
मजला फिदा करून गेली,
छतीस नखाऱ्यावाली तू
रातीची झोप मजली उडाली,
हसता तू निखळ
दुःख मजली नाहीशी झाली,
लाजता तू सये
क्षितिजाची लालिमा तुझ्या गाली,
गुपित मनातलं ओळखलंस तू
अन् कविता पूर्ण झाली...

