अजब गजब
अजब गजब
'मी कशी दिसते' -
असे विचारून गायब होणे ..
अजबच आहे !
'आलेच हं दोन मिनिटात' -
म्हणून दोन तासानी येणे ...
नवलच आहे !
मी विसरतो ते -
नेमके तुलाच आठवणे ....
गंमतच आहे !
दोघांचे जन्मात केव्हातरी -
एकमत होणे .....
आश्चर्यच आहे !
'अहो, ऐकलं का '
तू म्हटल्याबरोब्बर -
मी "हो" म्हणणे ....
गजबच आहे !