अधुरं प्रेम
अधुरं प्रेम
प्रेम नाही म्हणतेस मग गालात का हसतेस
जरा काही बोललं की रुसून का बसतेस
शब्द देत्तात नकार तुझे डोळे मात्र वेगळच बोलतात
सूर्याकडे पाहून जणू सूर्यफूल डुलतात
प्रेम नाही म्हणतेस मग लाडात का येतेस
लालचुटुक ओठांनी आमंत्रण का देतेस
कसं सांगू तुला किती प्रेम करतो मी
तुझ्या डोळ्यात पाहताच स्वतः ला विसरतो मी
दुःख जरी तुझं असलं डोळे मात्र माझे रडतात
तुला खुशीत पाहून माझे सुध्दा गाल हसतात
माझ्या इतकं प्रेम तुझा साजण तरी करतो का ग
तुझे आश्रु टिपण्यासाठी रुमाल तरी धरतो का ग
खूप झालं प्रेम आता दूर जायला हवं
भूतकाळात किती रमणार पुढचं पाहायला हवं
थोडे दिवस होईल त्रास मला आणि तुलाही कदाचित
किती दूर गेलो तरी आठवणी मात्र राहतील